

—————————————— 👉 शिवाजी सेलोकर
ढाका: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा दौरा संपताच बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले (Attack on Hindu Mandir) होण्याचं सत्र सुरू झालं आहे. बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला आहे. कट्टर इस्लामवादी गटाच्या शेकडो सदस्यांनी रविवारी पूर्व बांगलादेशातल्या हिंदू मंदिरांवर आणि एका ट्रेनवर हल्ला केला. मोदींच्या दौऱ्याविरोधात इस्लामी गटांनी आंदोलनं केली. यावेळी पोलीस आणि आंदोलक भिडले. यामध्ये १० आंदोलकांचा मृत्यू झाला.
बांगलादेशाच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित होते. बांगलादेशच्या पंतप्रधान हसिना शेख यांच्याकडे कोरोना लसीचे १२ लाख डोस आणि १०९ रुग्णवाहिका सोपवून मोदी भारतात परतले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. याशिवाय भारत आणि बांगलादेशात ५ करार झाले.