लखमापूर येथील क्षतीग्रस्त शेतकऱ्याला मध्यवर्ती बँकेने दिला आधार,,

0
290

26 / 3 /2021 मोहन भारती
लखमापूर येथील शेतकरी दादाजी पांचभाई यांच्या शेतातील गहू पिकाच्या गंजीला भीषण आग लागली होती, या आगीत हरभरा पीक नष्ट झाले तसेच शेतीपयोगी अवजारे जळून खाक झाली, या आगीत दादाजी पांचभाई यांचे 2 लाखाचे नुकसान झाल्याचे पंचनामा मध्ये नमूद केले आहेत, तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे यांनी आमदार सुभाष धोटे व खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे सुद्धा आर्थिक मदत देण्यासाठी पाठपुरावा केला आहे,
आर्थिक संकटात सापडलेल्या दादाजी पांचभाई यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गडचांदूर शाखेने शेतकरी कल्याण निधी योजने अंतर्गत 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करून आधार दिला आहे,
10 हजाराचा धनादेश बँकेचे व्यवस्थापक श्री भाऊराव जोगी यांनी क्षतिग्रस्त शेतकरी दादाजी पांचभाई यांच्या सुपूर्द केला, याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, तथा बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here