जगभरात कापूस उत्पादन घटणार

जळगाव : जगात यंदा म्हणजेच २०२१-२२ मध्ये कापसाचे उत्पादन गेल्या वर्षाच्या किंवा हंगामाच्या तुलनेत सुमारे दीड दशलक्ष टनांनी घटणार आहे. नंतर नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे अमेरिका, चीन, भारत या प्रमुख कापूस उत्पादक देशांना फटका बसला. यामुळे कापूस उत्पादनात घट येणार आहे.  याच वेळी जगात जेवढे कापूस उत्पादन नव्या हंगामात हाती येईल, त्याचा १०० टक्के वापर होईल. यामुळे बाजारात दबाव राहणार नाही, असेही दिसत आहे. भारता, अमेरिका, चीनमधील लागवड घटली आहे. अमेरिकेत तर तेथील शासनाने सावर्जनिक जलस्रोत प्रथमच ताब्यात घेतले आहेत.
दुष्काळी स्थितीचा सामना तेथेही करावा लागला आहे. अमेरिकेतील टेक्सास या कापूस उत्पादनात अग्रेसर असलेला भागात उत्पादनासंबंधी अस्थिरता, घट, असणार आहे, असे जाणकारांचे मत आहे. भारतातही लागवड सुमारे १० लाख हेक्टरने घटली आहे. चीनमध्येही लागवड वाढलेली नाही. गेल्या वर्षात भारतात २०१९-२० च्या तुलनेत कापसाची लागवड २०२०-२१ मध्ये चार लाख हेक्टरने वाढून १२९ लाख हेक्टरवर पोहोचली. भारतात ४०० लाख गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशनने ऑक्टोबरमध्ये कापूस उत्पादनात देशात घट होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. असोसिएशनच्या नव्या अंदाजानुसार देशात ३७० ते ३७५ लाख गाठींचे उत्पादन सप्टेंबर २०२१ अखेर हाती येईल, असे दिसत आहे. कोरोनामुळे कापूस बाजारावर परिणाम झाला. कापसाचा साठा वाढला. हा साठा तब्बल २०२०-२१ मध्ये सुमारे २१.९९ मेट्रिक टनांपर्यंत होता. पण यंदा साठाही कमीच आहे. कारण कोविडमुळे कापडाची मागणी वाढली. वस्त्रोद्योगात रुईची सतत मागणी राहिली. यामुळे जगभरात कापसाचा साठा घटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here