लोकदर्शन 👉 महेश गिरी नागपुर
नागपुर– भटके विमुक्त हक्क परिषद,विदर्भ विभागाच्या वतीने ओबीसी व भटके विमुक्त आरक्षण जनजागृती मोहीम सोमवार दि १६/०८/२०२१ रोजी अध्यापक भवन, गणेश पेठ, नागपुर येथुन सुरू होत आहे. ही आरक्षण जनजागृती मोहीम पुढे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, व कोकण विभागात तीन महिने चालणार आहे. या मोहिमेचे उदघाटन नागपुर येथे मा ना विजय वडेट्टीवार साहेब (बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र)यांचे शुभ हस्ते होणार आहे. या प्रसंगी महाजोती संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. श्री बबनराव तायवाडे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच हक्क परीक्षेचे प्रदेशअध्यक्ष मा. श्री धनंजय ओंबसे, कार्याध्यक्ष श्री शंकरराव माटे,सचिव प्रा. श्री सखाराम धुमाळ, मुख्य संघटक श्री पुरुषोत्त काळे, कर्मचारी आघाडी अध्यक्ष श्री कृष्णात जाधव, उद्योग आघाडी अध्यक्ष श्री नंदकुमार गोसावी,युवा आघाडी अध्यक्ष प्रतीक गोसावी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात भटके विमुक्त हक्क परिषद विदर्भ विभाग पदाधिकारी यांच्या पदाचे व लोककलावंताना हक्क परिषदेतर्फे प्रमाणपत्राचे वितरण मा. मंत्रीमोहोदय श्री विजय वडेट्टीवार यांचे शुभ हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती हक्क परिषदेचे विदर्भ विभाग अध्यक्ष श्री महेश गिरी यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नागपुर संयोजन समितीचे पदाधिकारी श्री विजय आगरकर, श्री नितेश पुरी, दिनेश राठोड, गोवर्धन बडगे,दयालनाथ नानवटकर, प्रदीप पाचंगे,प्रदीप पुरी इ. परिश्रम घेत आहेत.