लोकदर्शन चंद्रपूर :👉मोहन भारती
चंद्रपूर शहर व संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसच्या बाजूने जनतेचा कल अधिक दृढ होत असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत असून, पुन्हा एकदा काँग्रेसची जादू चंद्रपूरात अनुभवास येत आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांनी केले.
काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते आमदार मा. विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर, शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकसंघपणे राबविलेली प्रभावी प्रचार रणनीती, सातत्यपूर्ण परिश्रम आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी यामुळेच काँग्रेसला चंद्रपूर शहर व जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने नेहमीच सामान्य जनतेच्या समस्या, शेतकरी, कामगार, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले असून, याच विश्वासाच्या बळावर जनता पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी उभी राहत असल्याचे सुभाषभाऊ धोटे यांनी नमूद केले. येणाऱ्या काळातही काँग्रेस पक्ष याच पद्धतीने जनसेवेच्या कामात हिरिरीने सहभागी राहून चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काँग्रेसच्या बाजूने जनतेने दिलेल्या या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल सुभाषभाऊ धोटे यांनी चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानले.





