लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (दि. ११) Chandrapur शहरातील नगीना बाग, प्रभाग क्रमांक ९ येथे भाजप युती उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. या जनसंवाद कार्यक्रमात देवराव दादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांशी थेट संवाद साधत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप युतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून नागरिकांच्या समस्या जाणून घेत पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा, नवीन विकासकामांची गरज, आरोग्यविषयक अडचणी अशा अनेक मूलभूत विषयांवर कॉर्नर सभेतून मनमोकळा संवाद साधण्यात आला. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करत विकासाभिमुख धोरणांची माहिती देण्यात आली.
यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुकीत चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. भाजप युती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून निवडणुकीबाबतचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, नगरसेवक उमेदवार राहुल पावडे, प्रशांत चौधरी, सविता कांबळे, शीतल आदे, प्रलय पिपरमवार यांच्यासह चंद्रपूर शहरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, व्यापारी संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





