लोकदर्शन गडचांदूर👉रवि गेलडा
गढचांदुर येथील मेश्राम नगर, वार्ड क्रमांक सहा येथे श्री हनुमान महाअभिषेक पूजा व जाहिर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. जय बजरंग मंदिर परिसरात आयोजित या पवित्र सोहळ्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गढचांदुरचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री निलेश भाऊ ताज़ने उपस्थित होते. त्यांच्या सोबत रामसेवक मोरे, नगरसेवक महेश आवारी, नगरसेविका अर्चना ताई मोरे, ह.भ.प. दीपक महाराज पूरी, जय बजरंग मंदिराचे अध्यक्ष व माजी सरपंच डॉ. चरणदास फकरूजी मेश्राम, डॉ. प्रविणजी लोनगाडगे, अभिवक्ता अॅड. दीपक चटप, शेतकरी संघटनेचे सरचिटणीस संतोष पटकोटवार, नितीनजी डोरलीकर, गढचांदुर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हेड़ाऊ साहेब, आदिवासी समाजाचे नेते प्रेमदासजी मेश्राम, अंगदजी दराडे सर, समाजसेवक मनोजजी भोजेकर, हनुमान देवस्थानचे वसंता कूचनकर, अंकुश अंडर्सकर, पिंपळकर सर, रामदास मेश्राम, प्रविण मेश्राम, पुरुषोत्तम मेश्राम आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
महाअभिषेकानंतर सत्यपाल महाराजांचे शिष्य नयनपाल महाराज यांच्या सुमधुर किर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. तसेच विविध गावांतील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारोच्या संख्येने महिला व समाजबांधवांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
हा संपूर्ण कार्यक्रम शांतता, भक्तीभाव व सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा ठरला. आयोजकांनी सर्व उपस्थितांचे व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.





