डॉ भाग्यश्री जोगदेव, प्रणिता कांबळे, शुभांगी शिंदे, प्रा, सुरेखा भालेराव, सत्यशोधक रघुनाथ ढोक, राहुल खरात यांचा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव मुंबईमध्ये होणार सन्मान आर्यारवी एंटरटेनमेंट प्रोडक्शन तर्फे समाज भूषण पुरस्कार येत्या २० एप्रिलला दिला जाणार

 

लोकदर्शन पुणे,👉 रघुनाथ ढोक

भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेज ,पुणे, डॉ भाग्यश्री जोगदेव,आटपाडी
बार्टी प्रकल्प अधिकारी, प्रणिता कांबळे, सोलापूर,
प्रा सुरेखा भालेराव, पंढरपूर,
शुभांगी शिंदे पुणे,
रघुनाथराव ढोक, सत्यशोधक विवाह कर्ते, राहुल खरात
यांचा मुंबई मध्ये होणार सन्मान उपरोक्त प्रॉडक्शनच्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे औचित्य साधून विशेष गौरव प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन, कला क्षेत्रातील, वरील सर्वांच्या अनमोल योगदानाची विशेष दखल घेऊन आर्याखी एंटरटेनमेंट प्रोडक्शन तर्फे समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्याच्या कार्य क्षेत्रातले आपले कार्यसातत्य व अतुलनीय कामगिरी अधिकाधिक वृद्धिंगत होवो, हीच सदिच्छा देऊन यांना सदर पुरस्कार प्रदान शनिवार दि. २० एप्रिल, २०२४

रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दुसरा मजला, नायगाव, दादर (पूर्व) या ठिकाणी देण्यात येणार आहे. असे निवडीचे पत्र सिने दिग्दर्शक महेश्वर यांनी दिलें आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here