Home
Home राजकीय पाच वरीस झालेकात येतेत मत मांगाले..!!

पाच वरीस झालेकात येतेत मत मांगाले..!!

सुनील पोटे यांची झाडीबोलीतील कविता, राजकारणावर परखड भाष्य 

 

पाच वरीस झालेकात येतेत मत मांगाले
मंग पुन्ह्यान दावत नाइ नेते तोंड गावाले

अमका करतो तमका करतो भास्यन मोटमोटे
डांबर जाते वाहून निसते उभे दिसतेत गोटे
मोटीभारी टाकी पना पानीस नाइ नडाले
पाच वरीस झालेकात येतेत मत मांगाले

वल्ला सुका दुस्कार वरुन लाल्या करते जोर
माय बइन जगते लपवत कासऱ्याचा दोर
दोन पैस्याची मदत भेटते सातबाऱ्याले
पाच वरीस झालेकात येतेत मत मांगाले

आल्यावरतं निवडून रायतेत आपल्यातस दंग
सत्तेसाटी बदलतेत सरड्यावानी रंग
बगल देनं जमते याइले विकासाच्या मुद्याले
पाच वरीस झालेकात येतेत मत मांगाले

लोकशाही लागलीय भाऊ कोंबड्यावानी झुरु
थे नाइ दिसत तुले, दिसते निसती दारु
समजलं कवा किंमत हाय तुह्या यकयं मताले
पाच वरीस झालेकात येतेत मत मांगाले

✍️ सुनील शामराव पोटे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here