शेकडो रुग्णांनी घेतला वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचा लाभ

By : Shankar Tadas
वरोरा :
सार्वजनिक आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोराच्या वतीने आज भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रतिभाताई धानोरकर उदघाटक तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ महादेव चिंचोळे जिल्हा शल्य चिकित्सक, प्रमुख पाहुणे डॉ हेमचंद कन्नाके (नि वै अ.) डॉ. प्रफुल खूजे, वैद्यकीय अधीक्षक, उ जी रु, वरोरा, श्री सुभाष दांदडे (आमदार प्रतिनिधी) सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका ,डॉ प्रतीक बोरकर (तालुका आरोग्य अधिकारी) डॉ विरुटकर, डॉ बोरकर उपस्थित होते.स्वागत गीत सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका,आलिन सिमोन ,प्रमोद म्हशाखेत्री,स्वाती अडगूलवार चंदा ऊमक यांच्या चमुने गाईले.
प्रास्ताविक करताना डॉ चिंचोळे यांनी तालुक्यातील फ्लोराइडयुक्त पाण्याच्या वापराने अस्थी व दातावर झालेल्या परिणामावर या शिबिरात होणाऱ्या उपचार याची माहिती दिली. उदघाटकीय भाषणात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध सेवा व सुविधा बाबत समाधान व्यक्त करीत नागरिकांनी या शिबिरात होणाऱ्या विविध तज्ञ डॉक्टर, सावंगी मेघे येथील वैद्यकीय चमू कडून उपचार व होणाऱ्या शस्त्रक्रिया यांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. तसेच 100 खाटाच्या रुग्णालय इमारत बांधकाम निधी पाठपुरावा या बाबत माहिती दिली. शिबिराचे निमित्ताने पोषण आहार विभाग, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र व क्षय रोग, NCD, किटकजन्य रोग, सिकल सेल, अवयव दान,आदी विभागाचे आरोग्य शिक्षण प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा समारोप डॉ खुजे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. शिबिरा करिता सर्व कर्मचारी व आधीकारी यांनी परिश्रम घेतले. सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी अवयव दानाची माहिती दिली व अवयव दान रक्त दान देह दान नेत्र दान करण्याचें आवाहन केले.तर संचालन श्री गोविंद कुंभारे व सोनाली रासपायले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here