कु.ईश्वरी खटावकरला एक लाखाचे बक्षीस मिळाले..!

 

लोकदर्शन कऱ्हाड-👉अनिल देशपांडे

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज चा एक लाख रुपयांचा रोख पुरस्कार इस्लामपूर येथे राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या कु.ईश्वरी शेखर खटावकर हिला सांगलीचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी मिळाला…

कु.ईश्वरी खटावकर ही राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने व त्यांचे दोन सहकारी श्री.निखिल महामुनी व श्री ओंकार पाटील यांनी तयार केलेल्या ओ-रोबो ला हा पुरस्कार देण्यात आला…या नाविन्यपूर्ण ओ-रोबो मुळे कारखान्यात अनेक कामे जलद व अचूक पणे होतात, कु.ईश्वरी खटावकर या ओ रोबोचे प्रात्यक्षिक अनेक कारखान्यात करून दाखविले…
कु.ईश्वरी खटावकर हिच्या यशात महाविद्यालयाचे प्राचार्य,विभाग प्रमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले…
कु.ईश्वरी खटावकर ही रयत शिक्षण संस्थचे कर्मचारी श्री शेखर खटावकर व कऱ्हाड तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षिका श्रीम लीना वैद्य यांची कन्या आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here