नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे गडचांदूर येथे पत्रकार सन्मान सोहळा

By : Shankar Tadas

गडचांदूर :
नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र राजुरा विधानसभा यांच्या वतीने 9 जानेवारीला गडचांदूर शहरातील वृत्तपत्र प्रतिनिधी तथा पोर्टल प्रतिनिधी यांचा राजुरा विधानसभा निवडणूक प्रभारी देवरावदादा भोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देवरावदादा भोंगळे यांनी यावेळी पत्रकारांचे लोकशाहीतील महत्व आणि पत्रकारांच्या अडचणी याविषयी विचार मांडले. पत्रकार नासिर खान आणि शंकर तडस यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीच्या गडचांदूर बस स्थानकाजवळील नवीन कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे गडचांदूर शहर अध्यक्ष सतीश उपलंचीवार, शहर महामंत्री हरीशजी घोरे, ज्येष्ठ नेते महेशजी शर्मा, महादेवराव एकरे, अरुण डोहे, निलेश एकरे, राकेश अरोरा व सौ. विजयलक्ष्मी डोहे, हितेश चव्हाण आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सत्कार करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये ज्येष्ठ पत्रकार के.के. श्रीवास्तव, सिद्धार्थ गोसावी, शंकर तडस, रवींद्र नगराळे, नासिर खान, दिपक खेकारे, धनसिंग शेखावत, शिवाजी सेलोकर, रवी बंडीवार, मुमताज अली, हबीब शेख, उद्धव पुरी, प्रमोद खिरडकर, मयूर एकरे आदी पत्रकारांचा समावेश होता. यावेळी रामसेवक मोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here