वनसडी येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

लोकदर्शन👉मोहन भारती

कोरपना :– कोरपना तालुक्यातील वनसडी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या प्रसंगी वनसडी येथील भाजप, शेतकरी संघटना, शिवसेना या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात विठ्ठलराव उरकुडे ,गजानन वाढई, दौलत रागीट, संजय बोढाले राजकुमार राठोड, श्रीकांत पाचभाई, रमेश धानकी, नीलकंठ किन्नाके यांचा समावेश आहे. सर्वांना काँग्रेसचे दुप्पटे देवून आमदार धोटे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. त्यांचे स्वागत केले. तसेच नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी जि प सदस्य उत्तमराव पेचे, माजी उपसभापती संभा पा. कोवे, सिंधुताई आस्वले, बाळकृष्ण कोमावार, सरपंच मंगलताई आत्राम, राजाभाऊ गलगट, माजी सरपंच ललिता गेडाम, भास्कर जोगी, नवनिर्वाचित ग्रा.स. इरफान शेख, सुरेखा जोगी, प्रियंका पिंपळकर, निता तोडासे, भारत तोडासे, नंदू गेडाम, श्रीधर रागीट, सुधाकर आस्वले, प्रमोद कटोटिया, राजकुमार बावणे, डॉ. कवडू पिंपळकर, शंकर कोल्हेकर, तात्याजी उलमाले, दारासिंग राठोड, हरिदास भोयर ,अजय भोयर, किशोर पिंपळकर, सुदर्शन डवरे, अशोक आस्कर, शामकांत निखाडे, कैलास मेश्राम, भास्कर तुरणकर यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रोशन आस्वाले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here