क्षेत्रातील विकास कामांमुळेच ग्राम पंचायत निकालात कॉंग्रेसची सरसी – आमदार सुभाष धोटे

 

लोकदर्शन 👉.मोहन भारती

राजुरा :- राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाने उत्कृष्ठ कामगिरी केली. राजुरा विधानसभा क्षेत्रातही कॉंग्रेसने दमदार कामगिरी करीत ८४ ग्रामपंचायतच्या निकालात ४२ सरपंच व अनेक ठिकाणी सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निकालात विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेसला मिळालेले घवघवीत यश हे क्षेत्रात आपण करीत असलेल्या विविध विकास कामांचे, कॉंग्रेसच्या सर्व पाधाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे व कॉंग्रेस प्रेमी नागरिकांच्या विश्वासाचे फलीत आहे अशी प्रतिक्रिया लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी विश्रामगृह राजुरा येथे दिवाळी स्नेहमिलन निमित्य आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.
क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात विविध विकास योजनांना मंजुरी मिळवुन कोट्यावधी रुपयांची विकास कामे पूर्ण केली आहेत तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. क्षेत्रात चारही तालुक्यात अतिवृष्टी, पूरपरिस्थिती व खरवडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 49 कोटी 2 लक्ष रुपयाची मदत मिळवून दिली. शेतकऱ्यांना सिंचनाची मुबलक सुविधा व्हावी या हेतुने अर्थ संकल्प 2021-2022 अंतर्गत गेटेड साठवण बांधाऱ्यांसाठी 43 कोटी 41 लक्ष चा निधी मंजूर केला. गोंडपिपरी प्रशासकीय ईमारत बांधकामाकरीता 15 कोटी निधी मंजुर, राजुरा पशुवैधकीय चीकीत्सालय बांधकामासाठी 5 कोटी मंजूर, जिवती येथे सा. बा. उपविभागीय कार्यालय व शासकीय विश्राम गृह बांधकाम करणे 2 कोटी 19 लक्ष मंजुर, प्रधानमंत्री/ मुख्यमंत्री ग्राम ग्राम सडक योजना अंतर्गत 66 कोटी मंजुर. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (RCPLWEA) अंतर्गत 178 कोटी मंजुर, ठक्कर बापा योजना मंजुर कामे – 2 कोटी 87 लक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना 2 कोटी 39 लक्ष मंजूर. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत मंजुर कामे-27 कोटी 22 लक्ष, 2515 ग्राम विकास निधी अंतर्गत मंजुर कामे 14 कोटी 37 लक्ष, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना मंजुर कामे – 1 कोटी 49 लक्ष, राजुरा, गोंडपिपरी येथिल तलाव व अमलनाला तलाव सौंदर्यी करणासाठी -15 कोटी 81 लक्ष, अमलनाला पर्यटन विकासासाठी 5 कोटीची अतिरिक्त मागणी. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 8 कोटी 50 लक्ष, नक्षलग्रस्त भागाचा विकास कार्यक्रम 7 कोटी 7 लक्ष, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ते 15 कोटी 36 लक्ष, विरूर स्टे., नांदा फाटा, शेणगाव, भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जनसेवेत कार्यरत. बेरडी पुनर्वसीत गावाच्या विकासासाठी 4 कोटी 25 निधीची मागणी.
क्षेत्रातील नगर परिषद व नगर पंचायत अंतर्गत रस्ते अनुदान योजना निधीतून 2 कोटी 77 लक्ष मंजुर निधी उपलब्ध करून देण्यात आला, साहाय्य अनुदान योजना अंतर्गत 2 कोटी मंजुर, नगरपालिकेला वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष ठोक तरतुद योजने मधुन 9 कोटी 7 लक्ष निधी मंजुर, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत शववाहिका (स्वर्गरथ) वाहणासाठी 30 लक्ष देण्यात आले, नगरपंचायतीला अग्निशमन वाहनासाठी 4 कोटी 25 लक्ष मजुर केले, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान योजनेंतर्गत 5 कोटी मंजुर, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नगरपंचायतीला 1493 घरकुल उपलब्ध करून दिले, जिवती तालुक्यातील १४ गावांच्या प्रश्नावर आपप केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आणि आता त्या गावांचे सिमांकनाचे काम सुरू झाले आहे अशी माहिती राजुरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजुरा विधासभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.
या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष दिनकर कर्णेवार, अॅड चंद्रशेखर चांदेकर, विजय ठाकरे, अभिजीत धोटे, काँग्रेसचे नवनिर्वाचीत सरपंच बेरडीचे मंदाबाई किन्नाके, सोनापुरचे जंगु पाटील वेडमे, उपरवाहीचे गीता सिडाम व उपरवाहीचे सर्व सदस्य यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

प्रसिद्धी प्रमुख
प्रा. प्रफुल्ल शेंडे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *