अकोला जिल्ह्यात शेतीहिताचा उपक्रम

By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
धरणांमध्ये साठलेला गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकणे; त्यातून शेतजमीन अधिक सुपिक करणे व धरणांची साठवण क्षमता वाढविणे असा दुहेरी लाभ असलेला उपक्रम सध्या #अकोला जिल्ह्यात राबविला जात आहे.

1 मे पासून सुरु झालेल्या या #गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार उपक्रमामुळे आतापर्यंत 30 हजार 637.88 घनमिटर गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला आहे. यामुळे 394 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम संपूर्णतः लोकसहभागातून राबविण्यात येत आहे.दि. 15 जून पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यात अकोला पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे विभाग, मृद व जलसंधारण विभाग, लघुपाटबंधारे विभाग, जि.प. अकोला या विभागांच्या अखत्यारीतील जलसाठ्यांतील गाळ काढण्याचे काम सध्या सुरु आहे. जिल्ह्यात एकूण 34 ग्रामपंचायतींच्या हद्दीत हा गाळ काढला जात आहे. त्यात अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील आठ, लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील तीन, मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील आठ तर लघुपाटबंधारे विभाग जि.प. अकोला यांच्या अखत्यारीतील 15 प्रकल्पांमध्ये हे गाळ काढण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत (दि.18 अखेर) सर्व प्रकल्प क्षेत्रातील मिळून 394 शेतकऱ्यांच्या शेतात हा गाळ टाकण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 30 हजार 637.88 घनमिटर गाळ काढण्यात आला आहे. 31 मे पर्यंत हे काम सुरु राहणार आहे.
****
आकाशवाणी नागपूर वृत्तविभाग यांची फेसबुक पोस्ट
*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here