मुंबईतील रुग्णसंख्या वाढत आहे,, मंगळवारी राज्यात चार करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर १३५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

 

एप्रिल  27, 2022

मुंबई: मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव काही अंशी वाढत असून मंगळवारी दैनंदिन रुग्णसंख्येने १०० चा आकडा पार केला आहे. मंगळवारी राज्यात १५३ रुग्ण नव्याने आढळले आहेत.

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या १०० च्या वर होती. त्यानंतर तिसरी लाट वेगाने ओसरत आल्यामुळे रुग्णसंख्येत घट कायम राहिली होती. मार्चमध्ये तर दैनंदिन रुग्णसंख्या ५० च्याही खाली गेली होती. परंतु एप्रिलपासून यात पुन्हा काही प्रमाणात वाढ होताना आढळली आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ापासून ही वाढ प्रामुख्याने दिसून येत असून दैनंदिन रुग्णसंख्या ५० च्याही वर गेल्याचे आढळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here