लोकदर्शन 👉 राहुल खरात
नागपूर ;
दैनिक बहुजन सौरभ मध्ये सहभागी असणाऱ्या आणि होणार लेखकांची दुसरी लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दैनिक बहुजन सौरभ हा बुध्द , शिवाजी ,फुले, शाहू आंबेडकर विचारांचा बुलंद आवाज आहे. अल्पकाळात मोठ्या प्रमाणात वाचकांचा प्रतिसाद मिळत आहे. पेपर चे एक लाख वाचक देश विदेशात आहेत. परिवर्तनाच्या चळवळीत बहुजन सौरभ हे वृत्तपत्र विचार परिवर्तनाचे शस्त्र झाले आहे. दैनिक बहुजन सौरभ ने आपले विचार धोरण ठरविले आहे. याच धोरणाचा एक भाग म्हणून दुसरी कार्यशाळा आहे. सर्वांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. दिनांक २८/३/२०२२ सोमवात वेळ – ५:०० वाजता . दैनिक बहुजन सौरभ कार्यालय . मेडिकल कॉलेज. अजनी पोलीस स्टेशन जवळ नागपूर. मुख्यसंपादक मिलिंद फुलझेले, निवासी संपादक प्रा संध्या राजूरकर