डॉ. शंकरराव खरात संदर्भात एक आठवण.

.

पुरुषोत्तम पारधे
लोकदर्शन 👉 राहुल खरात
जळगाव

आटपाडी ;

शंकरराव खरात हे महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती जगतातील एक मोठे नाव.त्यांनी मराठी साहित्याला,साहित्याचे खरे वळण देण्याचा प्रयत्न आपल्या साहित्य सृजनातून केला.ज्याला दलित साहित्य म्हटल्या गेले.ते जळगावच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावे अशी इच्छा खानदेशातील जेष्ठ नेते विचारवंत बाळासाहेब चौधरी यांची इच्छा होती. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात राजकारणात त्यांचा खूप मोठा दबदबा होता. त्यांनी या संमेलना बाबत जनशक्तीचे संपादक जेष्ठ समाजवादी नेते ब्रिजलाल भाऊ पाटील यांना त्याबाबत सूचित केले. याबाबतची पहिली सहविचार सभा भाऊंच्या पत्रकार कॉलनीतील घरी झाली होती. या बैठकीस त्यांच्या समवेत साहित्यिक स.सो.सुतार,नारायण शिरसाळे,रा.शे.साळुंके असे चार जण प्रारंभिक बैठकीस हजर होते. बाळासाहेब चौधरी यांनी सर्व जबाबदारी ब्रिजलाल भाऊ यांचेवर सोपवली होती .बाळासाहेब चौधरी यांचीच मनोमन इच्छा होती की या संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ शंकरराव खरात यांचीच निवड व्हावी.
त्याकाळी जळगावातील काही तथाकथित साहित्यिकांनी खरातांच्या नावाला विरोधही दर्शविला होता. मात्र बाळासाहेबांनी जे ठरविले होते ते खरातांची अध्यक्ष पदी निवड करून त्या चोपड्या तथाकथित साहित्यिकांच्या थोबाडीत सणसणीत हाणली होती. खरी गम्मत तेव्हा आली जे विरोध करणारे जळगाव मधील तीन जण होते ते मंच्यावर मोठमोठ्याने घोषणा देत होते. खरात सरांच्या विजयाच्या यावेळी मंचावर उपस्थित आणि ज्यांना हा किस्सा माहीत होतं ते डॉ गंगाधर पानतावणे. मात्र गालातल्या गालात त्यांच्यावर हसत होते हे जळगावच्या अनेक साहित्यिकांनी पाहिले आहे.
**पुरुषोतम्म पारधे*
जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here