सय्यद रमजान अली यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

लोकदर्शन 👉 मोहन भारती

चंद्रपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव सय्यद रमजान अली यांना बढती देऊन त्यांची नियुक्ती प्रदेश उपाध्यक्षपदी केली आहे. ही निवड महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी मो. अहमद खान यांनी दिल्ली येथून केली आहे. नियुक्तीपत्र सय्यद रमजान अली यांना प्राप्त झाले आहे.

सय्यद रमजान अली यांनी चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्याला सुरूवात केली. त्यानंतर अली हे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव म्हणून कार्यरत होते. तेव्हाच त्यांना महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष एम. एम. शेख यांनी गडचिरोली जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्त केले त्यानंतर त्यांना तेलंगणा येथील

आदिलाबाद विधानसभा क्षेत्रात पक्ष निरिक्षक म्हणून जबाबदारी सोपविली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन एम.एम. शेख यांनी त्यांची प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती केली. सय्यद रमजान अली हे पक्षासाठी नेहमी सक्रीय असल्याने त्यांची नियुक्ती प्रदेश उपाध्यक्षपदी करण्यात आली. अली यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय खा.बाळुभाऊ धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर, प्रदेश अध्यक्ष एम.एम. शेख. रहमतुल्ला खान यांचेसह अन्य मान्यवरांना दिले. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सोहेल रजा शेख यांच्यासह शेख मुख्तार भाई, बापु अन्सारी, आमीर शेख काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सय्यद रमजान अली यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. असे एका पत्रकान्वये जिल्हा महासचिव शेख मुखत्यार भाई यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here