भारतीय संग्रहालये व पुराभिलेखागर यांचा वारसा या विषयावर राष्ट्रीय वेबिनार।।                                   

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर:
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा, शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर आणि प्रिन्सिपल अरुणराव कलोडे महाविद्यालय नागपुर सोबत हेरिटेज फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय संग्रहालये व पुराभिलेखागर यांचा वारसा या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते भारतामधील समृद्ध संग्रहालये व अभिलेखागार यांची माहिती मिळावी यासाठी वरील विषयावर वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते, भारताची सांस्कृतिक विरासत, वैभव तथा समृद्धी या सर्व बाबी येणाऱ्या पिढीला माहिती व्हाव्यात, त्यापासून प्रेरणा घेऊन प्राचीन वस्तूच्या संग्रहाचे महत्त्व कळावे यासाठी हा विषय निवडण्यात आला या वेबिनार ला मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील मानव्यविज्ञान शाखेचे सहयोगी अधिष्ठाता तसेच इतिहास विभागातील प्रोफेसर डॉ श्याम कोरेटी यांनी उपस्थित राहून इतिहासाच्या अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी संग्रहालये व अभिलेखागार यांचे महत्व यावर आपले विचार व्यक्त केले, या वेबिनारला प्रमुख वक्ते म्हणून डॉ मुनमुन मंडल सहाय्यक प्राध्यापक लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालंधर पंजाब या दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून विदेशातील व भारतातील समृद्ध संग्रहालये व अभिलेखागार याची माहिती देताना आपल्या इतिहासाची समृद्धी, सांस्कृतिक वारसा कसा जोपासता येईल यावर प्रकाश टाकला, ही संग्रहालय म्हणजे आपली सांस्कृतिक श्रीमंती आहे त्यातून आपल्याला आपला इतिहास कळतो असे मत यावेळी व्यक्त केले, या वेबीनारला लाभलेले दुसरे वक्ते श्री भुजंग बोबडे हेरिटेज फाऊंडेशनचे डायरेक्टर यांनी इतिहासाचा अभ्यास करताना अभिलेखागार व संग्रहालये यांचे महत्त्व विशद केले, या अभिलेखागाराला भेट दिल्याशिवाय इतिहास लिहिणे शक्य नाही कारण आपला इतिहास या अभिलेखागारामध्ये संरक्षित आणि सुरक्षित आहे त्यामुळे या अभिलेखागारांचे व संग्रहालयांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे मत बोबडे यांनी व्यक्त केले, या राष्ट्रीय वेबिनार ला प्राचार्य डॉ एस. एम. वारकड प्राचार्य डॉ संजय कुमार सिंग प्राचार्य डॉ डी. आर. सातपुते उपस्थित होते. या वेबिनारसाठी तंत्र सहाय्यक प्रा. सुवर्णा नलगे यांनी काम पाहिले, या वेबिनार चे सूत्रसंचालन डॉ सचिन भोगेकर, प्रास्ताविक डॉ शरद बेलोरकर यांनी आणि आभार प्रा. गुरुदास बलकी यांनी मानले, हा वेबिनार गूगल मिटवर आयोजित करून युट्युब वर थेट प्रक्षेपित करण्यात आला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *