राजकीय नेत्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*⭕२४ तास उलटून देखील आरोपी मोकाट हि बाब पोलीस यंत्रणेवर प्रश्चचिन्ह उपस्थित करणारी !*

*⭕गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पत्र पाठवून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी*

*⭕खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी घेतली नगरसेवक नंदू नगरकर यांची भेट*

चंद्रपूर : सकाळी १० वाजताच्या सुमारास अज्ञात युवकांनी नगरसेवक नंदू नगरकर यांच्यावर हल्ला करीत जबर जखमी केले. हि बाब अत्यंत गंभीर असून याबाबत तात्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केली. आज नगरसेवक नंदू नगरकर यांच्या घरी जाऊन खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेस माजी शहर अध्यक्ष तथा नगरसेवक नंदू नगरकर हे नेहमी शहराच्या विकासाला घेऊन आवाज उठवीत असतात. त्यांना काही अज्ञात युवकांनी क्रिकेट बॅटने गंभीर जखमी केले. हि बाब चंद्रपूरच्या राजकीय क्षेत्रातील अतिशय गंभीर बाब आहे. अशा प्रकारचे हल्ले खपवून घेणार नसल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक यांना खासदार बाळू धानोरकर ह्यांनी भ्रमणध्वनिद्वारे संपर्क साधून आरोपींना तात्काळ पकडण्याची सूचना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here