Home
Home गडचांदूर / कोरपणा *वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न*

*वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न*

लोकदर्शन 👉प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी दिव्यकुमार बोरकर (जिल्हा उपाध्यक्ष) हे होते. कोरपणा व जिवती तालुक्याचे निरीक्षक म्हणून त्यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय गुरुदास मून, माननीय घनश्याम पिंपरे व माननीय तुकाराम दुर्योधन हे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात दिव्यकुमार बोरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, फुले–शाहू–आंबेडकरांचा वैचारिक वारसा जपणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने चांगली कामगिरी केली असून, संपूर्ण महाराष्ट्रात संघटना अधिक बळकट करण्याचे काम सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अधिक ताकदीने उतरून यश संपादन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रस्ताविक व मार्गदर्शन अमोल निरंजन यांनी केले. सभेचे संचालन आकाश पाझरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन धनराज निरंजने यांनी केले.

या सभेला दुर्गाजी आकेवार, बबन पेंदोर, तन्वीर कोतपल्लीवार, राणी वेलेकर, इंदुबाई तोटे, रोहन धोटे, केंद्रा निरंजने h, तिस्तर निरंजन, रणवीर मून, सुनीता करमरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here