Home
Home पुणे सायबर सिक्युरिटीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी कार्यशाळा संपन्न

सायबर सिक्युरिटीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी कार्यशाळा संपन्न

सायबर सिक्युरिटीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी कार्यशाळा संपन्न

लोकदर्शन 👉राहुल खरात

रेनोवेट इंडिया यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशाळा, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथे सायबर सिक्युरिटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दुपारी 12 ते 3.30 या वेळेत पार पडली.

या कार्यशाळेसाठी प्रशिक्षक श्री. अनिकेत खेतान यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरद्वारे चित्रफिती आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सायबर सिक्युरिटीची व्याख्या, गरज आणि वाढते महत्त्व याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

आजच्या डिजिटल युगात सर्व व्यवहार ऑनलाइन होत असल्याने प्रत्येकाने स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग टाळणे, आधार-पॅन क्रमांकासारखी संवेदनशील माहिती कोणालाही न देणे, मजबूत ई-मेल पासवर्ड ठेवणे, आणि सोशल मीडियावर सजग राहणे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, मोबाईलवर जास्त वेळ गेम्स व व्हिडिओ पाहण्यामुळे अभ्यासात एकाग्रता कमी होते आणि आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात, याबाबतही त्यांनी सचेत केले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारले व अनिकेत सरांनी सर्व शंकांचे निरसन केले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 250 विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमास प्राचार्य श्री. दहिफळे सर, उपप्राचार्या सौ. पिंपळे मॅडम, पर्यवेक्षक श्री. उमासे सर तसेच इतर सर्व शिक्षक उपस्थित होते. त्यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.

अध्यक्षा – उज्वला गायकवाड
सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here