By : Shankar Tadas
नांदा फाटा(कोरपना)
श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे स्थानिक पातळीवर शाळा स्तर विज्ञान प्रदर्शनी चे नुकतेच आयोजन करण्यात आले प्रदर्शनीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घनकचरा व्यवस्थापन अणुऊर्जा प्रकल्प यांत्रिक शेती पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयावरती प्रतिकृती भिंती पत्रके पर्यावरणाचे व्यवस्थापन या विविध विषयाला अनुसरून विविध प्रतिकृती तयार करत स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला यावेळी प्रमुख अतिथी व विशेष मार्गदर्शक म्हणून गुरुकुल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश डोंगरे उपस्थित होते अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल मुसळे यांनी भविष्यातील स्पर्धात्मक युगामध्ये टिकायचे असेल तर आपल्याला आत्तापासूनच विज्ञानाची कास धरावी लागेल पर्यावरण आणि पृथ्वीचा दिवसेंदिवस होत चाललेला ऱ्हास याशिवाय औद्योगिकीकरणामुळे ढासळलेला समतोल साधायला आजपासून सुरुवात करावी लागेल त्याकरिता प्रत्येकांनी विज्ञानाची कास्तर धरावीच सोबतच प्रत्येकांनी एक झाड लावत त्याचा संगोपन करावं असे मार्गदर्शन केले शिवाय उत्कृष्ट विज्ञान प्रतिकृती ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्रवीण प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटनीय कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका संगीता पानपट्टे यांनी तर प्रास्ताविक विकास दुर्योधन स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विज्ञान प्रतिकृतीचे पर्यवेक्षण तथा मूल्यमापन प्राध्यापक स्वप्निल डू मोरे प्राचार्य राजेश डोंगरे यांनी व आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रकाश लालसरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले





