लोकसभा निवडणूक सामान्य निरीक्षक व पोलिस निरीक्षक यांनी विधानसभा क्षेत्राचा घेतला आढावा ,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन देऊळगाव राजा : प्रा. अशोक डोईफोडे
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक सामान्य निरीक्षक मा. श्री. पी. जे. भागदेव आणि निवडणूक कायदा व सुव्यवस्था पोलीस निरीक्षक मा. सेंथील कृष्ण यांचे बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांनी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन त्यांनी मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासमवेत बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला.

निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व स्तरावरील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, मतदान यंत्रे सुरक्षा कक्षामध्ये सुरक्षित आहेत तसेच सी सी टी व्हि च्या सुरक्षितेविषयी खातरजमा श्री. भागदेव यांच्याकडून करण्यात आली. मतदानासाठी दिव्यांग, महिला आणि युवा अशी आदर्श मतदान केंद्र करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे यांनी दिली.

निवडणुकीच्या अनुषंगाने फिरते पथक, स्थिर पथक यांची संख्या सद्यस्थितीमध्ये पुरेशी आहे, आंतर जिल्ह्याच्या ठिकाणी चेक पोस्ट सक्रिय आहे, C-vigil ऍपवर येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक नवीन टीम गठीत करण्यात आली आहे, इत्यादी विषयाचा आढावा घेण्यात आला.

निवडणूक कायदा व सुव्यवस्था ( पोलीस निरीक्षक) मा. सेंथील कृष्ण यांनीसुद्धा सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील कायदा व्यवस्था, संवेदनशील मतदारसंघ, मागील कोणता अनुचित प्रकार घडला होता का याबद्दल आढावा घेतला.

आजच्या आढावा दौऱ्यामध्ये मा. तहसीलदार सिंदखेड राजा श्री. सचिन जैस्वाल , मा. तहसीलदार देऊळगावराजा वैशाली डोंगरजाळ , उपविभागीय अभियंता श्री. बी. एन. काबरे, नायब तहसीलदार देऊळगाव राजा अस्मा मुजावर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंदखेडराजा श्री. ब्रम्हदेव शेळके उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *