चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात या ज्वलंत समस्या व प्रश्न सोडविणे अपेक्षित ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ⭕मतदार राजाच्या अपेक्षा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर :  प्रा. अशोक डोईफोडे

चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा क्षेत्रात केंद्र शासन शी निगडीत अनेक प्रश्न प्रलंबित आहे. ते प्रश्न नव्या खासदाराकडून सोडवले जाणे अपेक्षित आहे. यात कृषी, सिंचन, आरोग्य शिक्षण,प्रदूषण , उद्योग , महामार्ग, रेल्वे , नागरी उद्ययन, पुरातत्व , गृह, वन,अर्थ खात्याशी संबंधित अनेक बाबी आहे. कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने कापूस व धान संशोधन केंद्र, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, टेक्सटाईल पार्क निर्मिती, सिंचनाच्या दृष्टीने निम्न पैनगंगा प्रकल्पाचा राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करणे , पहाड व दुर्गम भागात नवीन सिंचन प्रकल्प उभारणी, जुने प्रकलपाचा पूर्ण विकास, पैनगंगा वर्धा वैनगंगा विदर्भा, निगुर्डा, अंधारी , इरई, झरपट, शिरना नदीवर बरेज बंधारे बांधणे, आरोग्य विषयक केंद्रीय स्तरावरील आरोग्य संस्था स्थापन करणे , शैक्षणिक दृष्ट्या सीबीएससी पॅटर्न अंतर्भूत केंद्रीय शैक्षणिक संस्था उभारणी , सर्व घटकातील विद्यार्थ्यांना वस्तीगृह निर्मिती, प्रदूषणावर पाय बंद घालण्यासाठी प्रभावी उपाय योजना , नव्या पर्यावरण पूरक उद्योगाची उभारणी , उद्योगातील कामगाराचे प्रश्न , आय टी पार्क निर्मिती , परतवाडा – अमरावती – नेर – यवतमाळ – करजी – वणी – घुघुस – चंद्रपूर , कोरपना – वणी , तेलंगणा राज्यातील आसिफाबाद राष्ट्रीय महामार्ग पासून भारी – जिवती – येल्लापुर – आदिलाबाद , गोंडपिपरी – मुल , पांढरकवडा – घाटंजी – यवतमाळ मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून परावर्तित करणे , गडचांदूर – आदिलाबाद , मुल – गडचिरोली , बल्लारपूर – सिरोंचा , वरोरा – चिमूर – उमरेड , गडचांदूर – मुकुटबन -पांढरकवडा – घाटंजी – आर्णी – यवतमाळ रेल्वे मार्ग , चंद्रपूर – चांदा फोर्ट रेल्वे स्थानके जोडणी , सेवाग्राम ,नंदिग्राम रेल्वे गाडी, गोंदिया – बल्लारपूर बंद असलेल्या रेल्वे फेऱ्या पूर्ववत सुरू करणे, चंद्रपूर ,वरोरा ,भद्रावती, वणी ,मांजरी, विसापूर , माणिकगड ( चूनाला ), बल्लारपूर रेल्वे स्थानकावर न थांबणाऱ्या रेल्वेना थांबा मिळवून देणे , लोकसभा क्षेत्रातील रेल्वे स्थानक व माल धक्याचा अत्याधुनिक पायाभूत विकास , चंद्रपूर – नागपूर , गडचांदूर – नागपूर, गोंदिया – गडचांदुर शटल ट्रेन सुरु करणे , बाबुपेठ, राजुरा , विसापूर, देऊळवाडा, राजोली , मुल, गडचंदुर, वणी येथील रेल्वे मार्गावर उडानपूल , चंद्रपूर शहरातील मोरवा व प्रस्तावित मूर्ती विमानतळाचा विकास करणे , प्रवासी वाहतूक विमान सुरू करणे , पुरातत्व विभागाशी संबंधित नोदः नसलेल्या संपूर्ण ऐतिहासिक स्थळाचे पुरातत्व दप्तरी नोंद करणे , त्या स्थळांचा विकास घडवून आणणे , किल्ले , सराय, बुरुज आदी ऐतिहासिक बाबींचे संवर्धन होण्यासाठी उपाय योजना , चंद्रपूर , भद्रावती, वणी , राजुरा येथे संग्राहलय निर्मिती , महाराष्ट्र तेलंगाना सीमा वादात अडकलेल्या जीवती तालुक्यातील चौदा गावाचा प्रश्न निकाली काढणे , घोषित झालेल्या वन जमिनीचा प्रश्न सोडविणे , गरजूंना जमिनीचे पट्टे वाटप करणे , कोरपना , जिवती , झरी जामनी या तीन तालुका स्थरावर राष्ट्रीयकृत बँक स्थापन करणे , जिवती , झरी येथे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, व्यायाम शाळा निर्मिती, बी एस एन एल यंत्रणेचे पुनर्जीवन , प्रत्येक गावातील पोस्ट कार्यालयाला स्वतंत्र हक्काच्या इमारतीची निर्मिती, चंद्रपूर, बल्लारपूर ,वरोरा ,वणी, भद्रावती येथे असलेल्या केंद्र शासनाची निगडीत संस्थांचा, ताडोबा अंधारी , टिपेश्वर व्याघ्र प्रकल्प, लोकसभा क्षेत्रातील
तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ , जागतिक दर्जाचा विकास, केंद्रीय कल्याणकारी योजना प्रसार व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे ,ग्रामीण भागात रस्ते , स्वच्छ पिण्याचे पाणी आदी सोयीच्या उपलब्धता करून देणे, जिवती व झरी जामनी हे अतिदुर्गम अविकसित तालुके दत्तक घेऊन पायाभूत सुविधा विकसित करणे आदी प्रमुख मुद्दे असणार आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *