संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत 243 प्रकरणांना मंजुरी

By : Ravikumar Bandiwar

नांदा फाटा : कोरपणा येथे दि 21:02:2024 रोज मंगळवारला दुपारी 12:30 वाजता संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष कोरपणा होते तर प्रमुख पाहुणे श्री प्रकाशजी वटकर तहसीलदार साहेब,श्री मनोहर कुळसंगे समिती सदस्य ,सौ लक्ष्मीबाई कुळमिथे सदस्या,श्री सुरेश टेकाम सदस्य,श्री नारायण राठोड सदस्य,सौ रंजनाताई मडावी सदस्या,नगरपंचायत अधिकारी,पंचायत समिती अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत संजय गांधी निराधार,श्रावण बाळ, घटस्फोटीत व इतर योजनातिल 243 प्रकरणे मंजुरी साठी ठेवण्यात आली प्रधानमंत्री मोदी सरकार विकासित भारत संकल्प यात्रे अंतगत तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांना लाभ मिळावा या हेतूने गावा गावातुन फार्म भरनार्या सर्व लाभार्थ्यांच्या प्रकरनांना मंजुरी देण्यात आली संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना व इतर योजनेतिल पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवुन देण्यासाठी सर्वोतोपरी आमचा प्रयत्न राहील व कोणताही पात्र लाभार्थ्यी या योजने पासून वंचित राहानार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले या बैठकीला मोलाचे सहकार्य श्री ढोबळे बाबु,सौ मालेकार मडम,श्री कुळमिथे यांनी मोलाचे सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here