निखिल वाघ यांना 2024 चा डिजिटल मीडियाचा महागौरव पुरस्कार..!

 

लोकदर्शन 👉 अनिल देशपांडे

मुंबई दिनांक २९जानेवारी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई यांच्यावतीने बार्शीचे सुपुत्र निखिल वाघ यांना महागौरव 2024 पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोमवार दिनांक 29 जानेवारीला कोल्हापुरातील कणेरी मठ येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या दुसऱ्या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून महाराष्ट्रातील अनेक पत्रकार आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी निखिल वाघ यांना यासंदर्भात विशेष निमंत्रित केले आहे. निखिल वाघ सध्या भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे जनसंपर्क अधिकारी पदी कार्यरत आहेत. त्यापूर्वी पत्रकार म्हणून दैनिक लोकमत वृत्तपत्र आणि एबीपी माझा या वृत्तवाहिनीत निखिल वाघ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. जनसंपर्क आणि पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here