स्व .भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा कोरपना येथे गोविंद पेदेवाड यांचे व्याख्यान

स्व .भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा कोरपना येथे गोविंद पेदेवाड यांचे व्याख्यान

रविकुमार बंडीवार

नांदा फाटा : स्व. भाऊराव पाटील चटप प्राथ.व माध्य. तथा स्व.संगीता चटप उच्च माध्य.आश्रम शाळा कोरपना जि.चंद्रपूर येथे प्रजासत्ताक दिना निमित्त पालक मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी जि.प. शिक्षक गोविंद पेदेवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आपल्याला आवडेल त्या विषयात अभ्यास व परिश्रम करावे. आयुष्यभर याचका सारखे न राहता आयुष्याची सुरुवात चांगल्या प्रकारे करून शिक्षण घेत असताना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी .आपल्या बुद्धिमत्तेवर संवेदनशीलता जपण्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे गोविंद पेदेवाड यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले. या आयोजित व्याख्यान कार्यक्रमात त्यांनी आपल्या वकृत्व शैलीतून विद्यार्थ्यांशी हा संवाद अतिशय तळमळीने साधला. विद्यार्थ्यांनी अभ्यासात येणाऱ्या अडचणी यावर कसे मात करावे, तसेच आपल्या खाजगी किंवा व्यक्तिगत आयुष्यात ही निर्णय घेताना तर्कशुद्ध विचार कसा करावा, अडचणीत प्रसंगाला कसे सामोरे जावे याची जाणीव व समज या व्याख्यानातून पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मनोहरराव चटप, उद्घाटक मा. विजयराव बावणे संचालक -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, प्रमुख अतिथी मा .चेतन भाऊ चटप ,शाळेचे प्राचार्य मा. खडसे सर, मा.वानखेडे सर ,प्राथ. मुख्याध्यापक मा.आडकिने सर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here