श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था उरण व ओएनजीसीच्या सहकार्याने गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २७ जानेवारी महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे, आत्मनिर्भर बनावे या अनुषंगाने श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था उरण ही नेहमी प्रयत्नशील आहेत. महिलांनी स्वावलंबी, आत्मनिर्भर व्हावे, महिलांच्या हाताला काम मिळावा, महिलांचे समाजातील स्थान उंचावे या दृष्टीने या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. गोर गरिबांचे राहणीमान उंचावे व आर्थिक उन्नतीत हातभार लागावा या अनुषंगाने श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था उरण व ओएनजीसी कंपनी उरण यांच्या विशेष सहकार्याने शुक्रवार दि २६/१/२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता उरण शहरातील मिलन हौसिंग सोसायटी, ए विंग, पहिला मजला येथे गोर गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी ओएनजीसी कंपनीचे जनरल मॅनेजर (इन्चार्ज )भावना आठवले, एच आर मॅनेजर गौरव पतंगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, ओनजीसी कंपनीचे कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश कोर्लेकर, मनोहर थळी, रायगड भूषण राजू मुंबईकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल घरत,माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे,सीमा घरत, आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या.प्रस्तावनेत निलेश कोर्लेकर यांनी श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था उरण यांच्या कार्याची तसेच पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली. संस्थेचा लेखा जोखा त्यांनी सर्वांसमोर मांडला. तदनंतर ओएनजीसी कंपनीचे जनरल मॅनेजर इन्चार्ज भावना आठवले, एच आर मॅनेजर गौरव पतंगे यांच्या हस्ते दीप प्रज्वल करून व फीत कापून, श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था उरणचे अध्यक्ष संगीता ढेरे व यशोलक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अभया म्हात्रे यांनी सर्वांना शिलाई मशीनचे काम कसे चालते, कोणकोणत्या वस्तू शिलाई मशीन द्वारे बनविले आहेत. त्या वस्तू सर्वांना दाखविले.व विविध शिलाई मशीनचे पार्टस व त्याचे काम कसे चालते हे सांगितले. सदर महिलांचे व संस्थेचे कार्य पाहुन ओएनजीसीचे मॅनेजर (इन्चार्ज )भावना आठवले व जनरल मॅनेजर गौरव पतंगे यांनी सदर कार्यक्रमाचे कौतुक केले. व जे काही मदत लागेल ते आम्ही करू, यापुढेही तुमच्या संस्थेला, महिलांना आमचे नेहमी सहकार्य असेल असे आश्वासन दिले. उपस्थित मान्यवरांनीही संस्थेच्या विविध कार्याचे, उपक्रमांचे कौतुक करत संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन करताना संगीताताई ढेरे म्हणाल्या की २२ जानेवारी २०२४ रोजी उरण मध्ये गरीब गरजू व्यक्तींना, आदिवासी महिलांना १७ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. आणि आजही शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. आमच्या अनेक कार्यात ओएनजीसी कंपनी, संदेश ठाकूर, निलेश कोर्लेकर, मनोहर थळी सायली म्हात्रे आदी पदाधिकाऱ्यांचे नेहमी सहकार्य असते असे सांगत उपस्थित सर्वांचे संगीताताई ढेरे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्ष मंजू कुमार, सचिव कविता म्हात्रे, खजिनदार शमायला सोंडे, पूजा प्रसादे,वैदेही वैवडे,अनघा ठाकूर,सीमा निकम, सुप्रिया सरफरे, तृप्ती भोईर व यशोलश सामाजिक संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *