इंडियन ऑइल व्हेंचर लि. नवघर टर्मिनल कंपनी च्या वतीने पागोटे ग्रामपंचायतीस कचराकुंडी भेट

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २३ जानेवारीपागोटे ग्रामपंचायतीस इंडियन ऑइल व्हेंचर लि.कंपनी कडून गावातील कचऱ्याचे व्यवस्थीत साठवणूक होण्यासाठी गावात २४० लिटरच्या ५० कचराकुंड्या (डजबीन) भेट देण्यात आल्या.यावेळी इंडियन ऑइल व्हेंचर लि. कंपनीचे अधिकारी संदिप काळे (एच.आर.मॅनेजर), दिपक नाईक (मेन्टेनन्स मॅनेजर), प्रफ्फुल म्हात्रे (असोसिएट मॅनेजर) हे उपस्थित होते.

पागोटे ग्रामपंचायत सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सतीश पाटील, सदस्य सुजीत तांडेल, अधिराज पाटील, मयुर पाटील, सदस्यां प्राजक्ता हेमंत पाटील,करिश्मा पाटील, सोनाली भोईर, सुनीता पाटील, समृध्दी तांडेल, ग्राम सेविका अनिता म्हात्रे, पागोटे , गावचे अध्यक्ष प्रकाश भोईर, व त्यांची टिम, गावातील जेष्ठ नागरिक मनोहर पाटील, रमेश पाटील, महेश पाटील, डि. के. पाटील, दिपक पाटील, सदानंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.गावासाठी कचऱ्याचे योग्य ठिकाणी नियोजन होण्यासाठी गेले ३ते ४ महिने इंडियन ऑइल व्हेंचर लि. कंपनीच्या असोसिएट मॅनेजर प्रफुल्ल म्हात्रे व पागोटे गावचे ग्रामस्थ हेमंत वासुदेव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे गावातील कचऱ्याची साठवणूक आता कंपनीने दिलेल्या या कचराकुंडीत करता येईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतीश पाटील यांच्या सुंदर वाणीने झाले तर गावच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्याचे काम गावचे जेष्ठ नागरिक मुकुंद पाटील गुरुजी यांनी केले. पागोटे गावात झालेल्या या कचऱ्याचे योग्य नियोजनाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here