फुटबॉल पटू सोहन नवलगी व अथर्व म्हात्रे यांची स्पेन येथे होणाऱ्या फुटबॉल मिनी वर्ल्डकप २०२४ साठी निवड.

 

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि १९ जानेवारी उरण येथील दोन फुटबॉल पटू कु.सोहन चेतन नवलगी व कु. अथर्व निलेश म्हात्रे ह्यांची स्पेन बार्सिलोना येथे होत असलेल्या (फुटसल) फुटबॉल मिनी वर्ल्डकप २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्या साठी साठी निवड झाली असून ह्या टुर्नामेंट मध्ये सहभागी होण्याकरिता ते ६ फेब्रुवारी २०२४ रोजी स्पेन बार्सिलोनाला रवाना होणार आहेत. यु.ई.एस शाळेत शिकत असलेले हे दोन्ही विद्यार्थी सेवेन स्टार फुटबॉल अकॅडमी उरणचे संस्थापक व हेड कोच प्रवीण संग्राम तोगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. दोन्ही खेळाडूंना त्यांच्या या अद्वितीय कामगिरी बद्दल उरण मध्ये सर्वत्र भर भरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. फुटबॉल कोच प्रवीण संग्राम तोगरे सरांचेही त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here