चंद्रपूरमधील ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोचे आंदोलन

by : Shankar Tadas

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोने हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने रोज ‘एक दिवस एक आंदोलन’ आंदोलनाची साखळीची सुरुवात केली. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी, इको-प्रोच्या सदस्यांनी रामाळा तलावाच्या काठावर निदर्शने आंदोलन करत एसटीपी बांधकामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली आहे.

इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी सांगितले की, रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असून तो शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. मात्र, या तलावात मच्छीनाला आणि जलनगरमधून येणारे सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. तलावात वाढणारी इकॉर्नीया, भुजलाचे प्रदूषण, तलावाच्या लगतच्या जलस्त्रोत प्रदूषित होणे, तलावाच्या घाण पाण्याची दुर्गधी यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. रामाळा तलावाच्या इको-प्रोच्या सत्याग्रह-आंदोलन नंतर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आश्वासन नंतर फक्त खोलीकरण झाले, मात्र सांडपाणी मुक्त करण्यास ‘एसटीपी’ बांधकाम प्रस्ताव मात्र प्रलंबित आहे.

इको-प्रोने या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, प्रशासनाने या समस्यांवर खोलकरण वगळता कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे इको-प्रोने हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ‘एक दिवस एक आंदोलन’ आंदोलनाची साखळीची सुरुवात केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून इको-प्रो प्रशासनाकडे रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी आवश्यक ती पावले उचलायला सांगणार आहे.

आंदोलनात सहभागी झालेल्या इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी ‘एसटीपी चे बांधकाम, रिटेंनीग वॉल चे बांधकाम त्वरीत पुर्ण करा’, ‘वाचवा वाचवा ऐतिहासीक रामाळा तलाव वाचवा’, ‘मुक्त करा मुक्त करा रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करा’ अशा घोषणा दिल्या.

इको-प्रोने या आंदोलनाच्या निमित्ताने विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविन्यात येणार आहे. या निवेदनात त्यांनी रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी एसटीपी बांधकामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली आहे. या मागण्याबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही इको-प्रोने दिला आहे.

या आंदोलनात इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन रामटेके, अब्दुल जावेद, रवी गुरनुले, कुणाल देवगिरकर, जयेश बैनलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, प्रमोद देवांगण, आकाश घोडमारे, राजू काहिलकर, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, मनीषा जैस्वाल, खुशबू जैस्वाल, प्रगती मार्कंडवार, प्रकाश निर्वाण, अतुल इंगोले, संदीप इंगोले, सुबोध संगमवार, शुभम खोब्रागडे, विशाल किन्नाके आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

…….

हिवाळी अधिवेशन निमित्त विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री यांचेकडे इको-प्रोची राज्यव्यापी मागणी केली आहे.

“चंद्रपूरसह राज्यातील अन्य अनेक शहरातील तलावांची सुध्दा हीच अवस्था असल्याने ही सर्व तलावे प्रदुषणमुक्त, सांडपाणीमुक्त करीत त्याचे पर्यावरणीयदृष्टया महत्व जाणुन संवर्धन करणेकरीता ‘महाराष्ट्र शहरी तलाव सांडपाणी-प्रदुषणमुक्त योजना’ राबविणे काळाची गरज आहे. राज्यातील शहरा-शहरातील हा तलावाच्या स्वरूपातील नैसर्गीक व ऐतीहासीक वारसा नष्ट होण्यापासुन वाचविण्यासाठी शासनाचा मोठा उपक्रम ठरू शकेल. या संदर्भात राज्य शाशनाने अभियान राबवित दर्लक्षित व नष्ट होऊ पाहणारे तलावांना नवसंजीवणी देण्यात यावे”

: बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो चंद्रपूर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *