थांबाच नाही, मुंबईला आम्ही जायचे तरी कसे…??

 

by : Rajendra Mardane

*रेल्वे प्रवासी संघ करणार SDM ऑफिससमोर उपोषण
चंद्रपूर : कोरोना काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, वरोरा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा तसेच मुंबई, पुण्यासाठी दररोज सुपर एक्सप्रेस चालविण्यात यावी, या मागणीला घेऊन वरोरा- भद्रावती- चंद्रपूर
रेल्वे प्रवासी संघ आक्रमक झाला आहे. आता या मागणीला घेऊन संघाच्या वतीने वरोरा येथील उपविभागीय कार्यालयासमोर 30 नोव्हेंबर रोजी उपोषण करण्यात येणार आहे.
वरोरा – भद्रावती- चंद्रपूर स्थानकावर प्रवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी अनेकवेळा निवेदन दिने, आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र ना समस्या सुटल्या, ना पुणे- मुंबईसाठी रेल्वे सुरू झाली, जी हक्काची सेवाग्राम होती ती सुद्धा बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नाही तर लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे सुरू करण्याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी दिला होता. मात्र रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केल्याने आता 30 नोव्हेंबरला उपोषण करण्यात येणार आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह जिल्ह्यातील जनप्रतिनिधी वरीष्ठ अधिकारी, मध्य रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी आदींना निवेदन दिले. हे विशेष.
याबाबत उपविभागीय अधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापूरे यांना निवेदन देण्यात आले.
***
कर्मचारी, रुग्णाला नाहक त्रास
मुंबईला अनेक रुग्ण उपचारासाठी जातात.कर्मचारी, अधिकारी शासकीय कामासाठी नियमित
मुंबई ला जातात. मात्र जाण्यासाठी त्यांनाही त्रास होतो, एवढेच नाही तर कोट्यावधी रुपये खर्च करून बल्लारपूर येथे पिट लाईनही तयार करण्यात आली आहे, मात्र पैशाचा चुराडा झाला आहे, हे सर्व बघता, किमान आम्हाला मुंबई, पुणेला जाण्यासाठी दररोज एक रेल्वे द्या, वरोरा येथे प्रत्येक गाड्यांचा थांबा Bday
अशी मागणीही वरोर- भद्रावती- चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाने केली आहे.
***
उपोषण आंदोलनात सहभागी व्हा
सामान्य नागरिकांच्या हक्काची रेल्वे सुरू करण्यात यावी यासाठी
30 नोव्हेंबर रोजी आयोजित उपोषण आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वरोरा- भद्रावती- चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाने केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *