निशुल्क महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद : २४१५ रुग्णांनी घेतला लाभ. ♦️आमदार सुभाष धोटे मित्र परिवाराचे यशस्वी आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

जिवती :– महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम, आदिवासी बहुल अशा जिवती तालुक्यात आणि परिसरात महागडे उपचार परवडत नसल्याने अनेक नागरिक दुर्धर आजाराने त्रस्त असतात. आरोग्याच्या विविध शासकीय योजनांचा लाभ पोहचूनही अत्याधुनिक सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक रूग्णांना आरोग्याची काळजी घेणे शक्य होत नाही ही बाब लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे मित्र परिवार आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय आश्रमशाळा, जिवती येथे भव्य निशुल्क आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराला जिवती तालुका आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात एकूण २४१५ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय सावंगी मेघे चे प्रत्येक विषयाचे तज्ञ डॉक्टर व टिम ने आधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज व्यवस्थेसह नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी दंत आजार, मुखाचे आजार, स्तनांचे कर्करोग व इतर आजार, हृदयरोग, बालरोग, स्त्रीरोग, कॅन्सर, अस्थिरोग, श्वसन रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मोतीबिंदू, काचबिंदू आजार, कान, नाक, घसा, डोळ्यांचे आजार, पोटाचे विकार, शस्त्रक्रिया, हर्निया, हायड्रोसिल आदींचे स्पेशलिस्ट डॉक्टर व यंत्रणा सज्ज होती. विविध आजारांची तपासणी करून रुग्णांना सावंगी मेघे येथे पाठविण्यात येणार आहे.
शिबीराचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख पाहुणे म्हणून राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, सुग्रीव गोतावडे, जिवती चे नगराध्यक्ष कल्पना आडे, उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथील डॉ. शिंगणे, डॉ. उपाटे, डॉ. बाबाजी घेवडे, डॉ. अशोक मेहेंदळे, डॉ. अभिषेक इंगोले, जिवती चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंबे, तसेच भारी, पाटण, शेनगाव, जिवती येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, भीमराव मडावी, नंदाताई मुसने, अश्फाक शेख, जब्बार शेख, सिताराम मडावी, माधव डोईफोडे, आशिष डसाने, विष्णूकांत रेड्डी, नारायण वाघमारे, ताज्जुदिंन शेख, माजी नगरसेवक सचिन भोयर, संतोष महाडोळे, शब्बीर पठाण, अजगर शेख, सुनिल शेळके, दिवाकर वेट्टी, सीडीपीओ उईके मॅडम, नगरसेवक ममता जाधव, अमर राठोड, वामन पवार, दत्ता गिरी, बंडू राठोड, दत्ता गायकवाड, तिरुपती पोटे, दत्ता तोगरे, बालाजी गोटमवाड, उत्तम ढगळे, मारोती मोरे, बाळु पतंगे, सुरेश कोडापे, सत्तरशहा कोटनाके यासह हजारोच्या संख्येने स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *