आमदार सुभाष धोटेंनी रुग्णालयात भेटून केले त्या जखमी कामगारांचे सांत्वन. ♦️लॉयड्स मेटल स्टील प्लांट घुग्गुस कंपनी प्रशासनाला कामगार सुरक्षेस प्राथमिकता देण्याच्या दिल्या सुचना

लोकदर्शन 👉मोहन भारती

चंद्रपूर :– दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी घुगुस येथील लॉयड्स मेटल स्टील प्लांट घुग्गुस जिल्हा चंद्रपूर येथे झालेल्या अपघातात ३ कामगार गंभीर जखमी झाले. हि बाब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना कळतात चंद्रपूर येथील डॉ. हेमंत पुट्टेवार यांचे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पिंटू भगत रा. कुर्ली, फिरोज खान व प्रमोद सिंघ रा. घुगुस यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करून गंभीर जखमी असलेल्या कामगारांवर योग्य उपचार करून त्यांचे उपचारावरील लागणारा खर्च कंपनीने करावा अशा सूचना प्लांटचे युनिट हेड संजीव कुमार यांना दिल्या. यानंतर घुगुस येथील लॉयड्स मेटल स्टील प्लांटच्या कार्यालयात प्रत्येक्ष भेट देऊन तेथील कामगारांच्या वारंवार होणाऱ्या दुर्घटना विषयी कंपनी व्यवस्थापनाचे सुरक्षतेच्या बाबत होत असलेले दुर्लक्ष निष्काळजीपणा यामुळे वारंवार दुर्घटना घळत आहेत. यापुढे अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नये साठी कंपनी व्यवस्थापनाने उपाय योजना करावी तसेच घडलेल्या प्रकरणाची राज्य शासनाचे औद्योगिक सुरक्षा व स्वास्थ संचालनालय मुंबई यांचे चंद्रपूर येथील विभागीय कार्यालयाचे अधिकारी श्री धन विजय उपसंचालक यांना चौकशी करून कार्यवाही बाबतच्या सूचना देण्यात आल्या.
या प्रसंगी संजीव कुमार युनिट हेड, एच आर पवन मेश्राम, घुगुस शहर काँग्रेस पदाधिकारी अन्वर सय्यद, मतीन कुरेशी कार्याध्यक्ष अल्पसंख्यंक, प्रवीण पडवेकर, रुचित दवे, कल्यान सोरारी, शामराव बोबडे, रोशन दंतलवार, मुन्ना लोहानी, सुधाकर भांदुरकर, अलीम शेख, रोहित डाकूर, गुड्डू मदार, आकाश चिल्का, अनुप भंडारी, रफिक शेख, अरविंद चांडे, सुनील पाटील, कपिल गोगुला, देव भंडारी, मोसीम शेख, शैजाद शेख, अनिरुद्ध आवडे यासह घुगुस काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here