इन्फंट कॉन्व्हेंट येथे शालेय विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा  :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न झाला. विद्यार्थी परिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन शाळेच्या सर्वांगीण विकासाला मदन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण रुजवण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलाने आणि शालेय प्रार्थनेने करण्यात आली. विदयार्थी परिषद संघातील विदयार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या हस्ते बॅचेस देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आपापली जबाबदारी योग्य व सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडावी याबद्दल मार्गदर्शनही करण्यात आले. सीबीएससीच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने यांच्यातर्फे विद्यार्थ्याचा शपथविधी समारंभ संपन्न करून कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली. तर विद्यार्थी प्रतिनिधींनीही आपले मत मांडले आमच्यावर सोपविलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून कर्तव्य योग्य रितीने पार पाडू असे आश्वासन त्यांनी दिले.
शालेय मंत्रीमंडळाच्या सर्व नवनियुक्त विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अंसारी यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाला शाळेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष सागर तर आभार प्रदर्शन चानी तेलंग यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here