महात्मा गांधी विद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्प्रशन जिल्हा प्रातिनिधि 👉प्रा. अशोक डोईफोडे

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली,
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे होते,सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य या विषयावर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,या स्पर्धेत प्रथम क्रमांक तेजस शास्त्रकार, द्वितीय क्रमांक पवन कनुरवार, तृतीय क्रमांक कु ज्योती आत्राम ,प्रोत्साहन पुरस्कार पवन बोधले यांनी पटकाविला, स्पर्धेचे परीक्षण प्रा सुधीर थिपे यांनी ,
याप्रसंगी श्री देवराव जाधव यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, संचालन व आभार प्रदर्शन प्रा बाळू उमरे यांनी केले,
यावेळी दिनविशेष समिती च्या प्रमुख प्रा नंदाताई भोयर,इतर सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते,
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here