आनंदराव अंगलवार यांचा BRS मध्ये प्रवेश

 

by : Shankar Tadas

चंद्रपूर : राजुरा विधानसभा क्षेत्रातील सामाजिक चळवळीत अनेक वर्षे सक्रिय असलेले आनंदराव वाय.अंगलवार यांनी भारत राष्ट्र समिती म्हणजेच BRS पक्षात प्रवेश केला आहे. ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ओ.बी.सी.,डि.एन.टी व बहुजन समाजातील चळवळीत सक्रिय आहेत. विविध समाज संघटना मध्ये सक्रिय कार्यकर्ता, राजकिय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. हैद्राबाद येथे  मान.के.चंद्रशेखर राव यांचे हस्ते गुलाबी दुपट्टा स्विकारून भारत राष्ट्र समिती ( बि.आर.सी) मध्ये प्रवेश केला. याप्रसंगी चंद्रपुर जिल्ह्यातील विविध गणमान्य व्यक्तीनीही बि.आर.एस.पक्षात प्रवेश केला. मान. श्री. के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री तेलंगाणा राज्य तथा राषट्रीय अध्यक्ष यांचे निर्देशानुसार व मान. श्री. बालका सुमन आमदार चेन्नुर याचे प्रभारी युक्त नियोजनानुसार 26 एप्रिल रोजी,  तेलंगाना भवन ,रोड क्रमांक 12,   हैद्राबाद येथे आयोजित कार्यक्रमात हा अंगलवार यांनी BRS प्रवेश केला.

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *