सालेझारी येथे महादेव मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना : आ. सुभाष धोटेंच्या हस्ते महापुजा संपन्न.

लोकदर्शन 👉मोहन भारती

गोंडपिपरी :– गोंडपिपरी तालुक्यातील मौजा सालेझारी येथे युवा एकता नाट्य कला मंडळ सालेझारी द्वारा आयोजिय भगवान महादेवाच्या मुर्तीसह श्री. पंचमुर्ती परमेश्वराची प्राणप्रतिष्ठापना परमपूज्य संत बालब्रह्मचारी पितांबर महाराज येनबोथला यांच्या हस्ते करण्यात आली. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आणि माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते महापूजा करतात आली.
या प्रसंगी गावामध्ये मोठ्या जलोषाचे वातावरण होते. गावकऱ्यांनी लेझीम पथक, ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढून पाहुण्यांचे जंगी स्वागत केले. वाजत गाजत मिरवणूक काढून मंदिर परिसरात धार्मिक विधी संपन्न करण्यात आला. पुजून, भजन, किर्तनानंतर गोपाळकाला व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचिरोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, माजी जि.प.सदस्य धर्मप्रकाश कुकुटकर, सालेझरी चे सरपंच राजू राऊत, माजी संचालक संभुजी येलेकर, कृ उ बा स माजी उपसभापती अशोक रेचकापुरे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, मनोज नागापूरे, सरपंच बालाजी चनकापूरे, यु. काँ. तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, उपसरपंच सारिखा भस्की, नंदाताई रोहनकार, पुष्पा भोयर, वैशाली राऊत, संदेश उराडे, संजय पिंपलशेंडे, तमुस अध्यक्ष साईनाथ बोरकुटे यासह सालेझरी व परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here