सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती*

 

लोकदर्शन गडचांदुर👉(अशोककुमार भगत)

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक संजय गाडगे, कला विभाग प्रमुख प्रशांत खैरे, एम.सी.व्हीसी विभाग प्रमुख विजय मुप्पीडवार, ज्येष्ठ शिक्षिका चटप मॅडम व मेहरपकूरे सर होते.
अध्यक्ष स्थानावरून विचार व्यक्त करताना, प्रत्येकांनी बाबासाहेबांचे विचार कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा जे बाबासाहेबांनी मिळवून दिले ती टिकवण्याची जबाबदारी सर्व सुशिक्षित व शिक्षक वृंदांची आहे ती त्यांनी अंगीकारावी असे आवाहन केले.
प्रमुख अतिथींनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याची अभ्यासपूर्ण माहिती देऊन सध्या देशात सुरू असणाऱ्या परिस्थितीतच्या संदर्भात अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे असे विचार व्यक्त केले. वर्तमान बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगिकारावेत असे प्रतिपादन प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसा संचालन ज्येष्ठ शिक्षक महेंद्र ताकसांडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार बी. एस. मरसकोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश पाटील ,माधुरी उंमरे ,सुषमा शेंडे ,नामदेव बावनकर, मेश्राम सर, राजेश मांढरे ,प्रा. झाडे ,प्रा.जहीर ,प्रा. सातारकर , प्रा.कु.ताकसांडे मॅडम,प्रा. गुजर, प्रा. पोडे, प्रभाकर पुंजेकर, लीलाधर मत्ते, सिताराम पिपळशेंडे ,शशिकांत चन्ने, प्रेमचंद आदोळे प्रभृतींनी कार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here