अशोक डोईफोडे यांचा सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे यांचा सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार संस्था व कनिष्ठ महाविद्यालय च्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ, साडी,व भेटवस्तू देऊन करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्था अध्यक्ष आमदार सुभाष धोटे होते,प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले ,गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली चे परीक्षा नियंत्रक तथा संस्थेचे संचालक डॉ अनिल चिताडे,संस्थेचे उपाध्यक्ष राहुल बोढे, प्रभारी सचिव धनंजय गोरे,संचालक विठ्ठलराव थिपे, विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे,श्रीमती उज्वलाताई धोटे, विमाशी चे जिल्हा अध्यक्ष केशवराव ठाकरे,माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण निमजे,नगरसेवक पापय्या पोन्नमवार,विक्रम येरणे,माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर ,सेवानिवृत्त प्रा,अशोक डोईफोडे, सौ प्रभाताई डोईफोडे, प्राचार्या स्मिताताई चिताडे ,प्राचार्य रामकृष्ण पटले होते, प्रा अशोक डोईफोडे यांनी या कनिष्ठ महाविद्यालयात एकूण तेहतीस वर्षे चार महिने पाच दिवस अशी प्रदीर्घ काळ सेवा केली, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रा डोईफोडे यांचे शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण राहिले आहेत. विविध प्रकारच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत,पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात लेखक म्हणून काम केले. हार्टीकल्चर विषयाची पाठ्यपुस्तक संपूर्ण महाराष्ट्रात वापरले जात आहेत, ग्राम स्वच्छता अभियान च्या मूल्यमापन समिती मध्ये सुद्धा त्यांनी कार्य केले आहेत, त्यांचे बहुसंख्य विद्यार्थी रोजगार, स्वयंरोजगार, करीत आहेत. सत्कार समारंभ मध्ये त्यांनी सत्काराला उत्तर देताना संस्था व महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून दिलेले प्रेम कधीही विसरणार नाही असे सांगितले. सत्कार समारंभ प्रसंगी प्रा,आरजू आगलावे यांनी डोईफोडे यांच्या कार्याचा परिचय करून दिला प्रास्ताविक प्राचार्या स्मिता चिताडे यांनी केले, संचालन प्रा आशीष देरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत धाबेकर यांनी केले, कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याधिकारी तथा तहसीलदार भगवंतराव डोईफोडे, नगर परिषद देऊळगाव राजा चे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी गजानन डोईफोडे,प्राचार्य साईनाथ मेश्राम, प्राचार्य हनुमंते, सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, तथा प्राध्यापक,विविध शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.(फोटो)

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *