दिघोडे गावाच्या विकासासाठी आणि क्रिकेटच्या उत्कर्षासाठी काँग्रेस पक्षाचा सरपंच असणे ही काळाची गरज. – महेंद्र शेठ घरत

लोकदर्शन उरण 👉 (विठ्ठल ममताबादे

उरण दि 1
एस, एन स्पोर्ट्स दिघोडे आयोजित प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत तसेच अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की आज आपल्या विभागातील अनेक क्रिकेटपटू मोठ्या उंचीवर आहेत आणि आपल्याच दिघोडे गावातील विश्वजीत ठाकूर हा तर या गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा भूषण आहे पण हे सर्व असताना प्रत्येक गावोगावी मैदानी टिकणे ही काळाची गरज आहे कारण आज काल अनेक भागांमध्ये मैदानच उपलब्ध नाहीत. क्रिकेट विषयी ज्यांच्या हृदयामध्ये अढळ स्थान आहे अशा नेत्यांनी अनेक गावांना संघर्ष करून मैदाने उपलब्ध करून देण्याचं काम केलं आहे. यामुळे दिघोडे ग्रामस्थांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये गुरुचरणाची जागा उपलब्ध करून आपल्या गावासाठी मैदानासाठी सर्व राजकीय चपला बाजूला ठेवून एकत्र येणे हे खूप महत्त्वाच आहे दिघोडे गाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून येणारे कालावधीमध्ये सर्व नेते मंडळींनी एकत्र येऊन पुन्हा एकदा हा आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी माजी सरपंच काशिनाथ पाटील, ज्येष्ठ काँग्रेस नेते अविनाश पाटील व माजी सरपंच कीर्तीनिधी ठाकूर या सर्वांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दिघोडे गावाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाचा सरपंच निवडून आणणे ही सर्वांचे जबाबदारी आहे असे मत महेंद्र घरत यांनी व्यक्त केले.तसेच केलेल्या आयोजनासंदर्भात माजी सरपंच कीर्तीनिधी ठाकूर, विश्वजीत ठाकूर, अभिजीत ठाकूर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून कौतुक करत असताना महेंद्र घरत म्हणाले की या भूमीतून एखादा खेळाडू आयपीएल पर्यंत जाणं हे माझं स्वप्न आहे विश्वजीत ठाकूरला इंग्लंड येथील लॉर्डसच्या मैदानावर खेळताना मी प्रत्यक्षदर्शी बघितल्यावर मला एक वेगळा आनंद मिळाला. आणि विश्वजीत ठाकूर आणि अभिजीत ठाकूर या दोन बंधूं बद्दल सुद्धा आणि रायगड मधील सर्वात बलाढ्य टीम बामणडोंगरी टीमने भिवंडी विभागामध्ये जाऊन 11 बाईक जिंकल्याबद्दल त्यांचेही तोंड भरून कौतुक आपल्या मनोगत मध्ये महेंद्र शेठ घरत यांनी यावेळी केले.या कार्यक्रमासाठी नवी मुंबईतील उद्योगपती नरेश शेठ भोईर, रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, गव्हाण गावचे उपसरपंच सचिन घरत, मच्छीमार नेते मार्तंड नाखवा, आर्यन ग्रुपचे डायरेक्टर समीर पाटील, वहाळचे उद्योजक अनिकेत भाई, मनोज पडते, वेश्वीचे माजी सरपंच अजित पाटील, उरण विधानसभा युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, माजी सरपंच काशिनाथ पाटील, ज्येष्ठ नेते अविनाश पाटील, माजी उपसरपंच कांचन घरत, माजी उपसरपंच अनंत म्हात्रे, माजी उपसरपंच कैलास म्हात्रे, माजी सरपंच चंद्रकांत वाणी, एम आय डी सी एरिया मॅनेजर एकनाथ घरत, एमआयडीसी एरिया मॅनेजर वर्षकेतू ठाकूर,मोठीजुई सरपंच तुषार पाटील, माजी उपसरपंच प्रफुल्ल पाटील, काँगेस कार्यकर्ते श्रावण घरत, पांडुरंग पाटील, पांडुरंग कासकर तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ व युवक काँग्रेस कार्यकर्ते, एस एन स्पोर्ट टीमचे सर्व सभासद क्रिकेट रसिक आणि क्रिकेट खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटनाचे निवेदन प्रसिद्ध शिवव्याख्याते दिनेश पाटील , प्रसिद्ध महिला निवेदिका रेशमा मयेकर यांनी केले. समालोचन रोशन पाटील, दशरथ पाटील आणि चंदू शेटे यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *