कुसुंबी माईन्स अल्ट्राटेक सुरक्षा नियमाचा फज्जा ,, वन्यप्राणी व पाळीव प्राण्याची जीवघेणा प्रकार

लोकदर्शन 👉 प्रतिनिधी

जिवती तालुक्याच्या माणिकगड पायथ्याशी निसर्ग पर्यावरणाचा ऱ्हास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे आदिवासी परंपरा धोक्यात येत असून जल,जंगल,जमीन वैभव नष्ट करीत डोंगराळ व वन वैभवाचा हिरव्या शालुने नटलेल्या क्षेत्रात पूर्वीचे माणिकगड सिमेंट म्हणजे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे नोकारी व कुसुंबी क्षेत्रात चुनखडी खदानी असून काही खदानीमध्ये मोठ्या प्रमाणात जल संचयन झाल्याने परिसरात पाणीटंचाई दुष्काळ स्थिती निर्माण झाली तर सुरक्षेच्या अभावामुळे अनेक वण्य प्राण्यांना जीवाने मुकावे लागत असलेल्या अनेक घटना घडल्या व कंपनी व्यवस्थापनाणे बिबट सह अनेक वन्य प्राणी रफा-दफा करण्यात यशस्वी ठरले. खाण परिसरात ४-५ गावच्या पाळीव प्राणी गाय,बैल,म्हैस,बकरी चा चराई करीता वावर असल्याने नुकताच कुसुंबी येथील श्री.उत्तम पवार यांच्या मालकीची गाय खदान परिसरात कोसळून जिव गमविला यामुळे गरीब शेतकऱ्याचे ५० हजाराचे नुकसान झाले यापूर्वी अनेक अशा घटना घडल्या व सुरक्षा विभागास अनेक तक्रारी करून लक्ष वेधले नागपूर येथील सुरक्षा अधिकाऱ्याने कंपनी व्यवस्थापनास सुरक्षेच्या अनेक सूचना कळविल्या मात्र कंपनीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.प्रदूषण, सरंक्षण भिंत, वन्य प्राणी सुरक्षेसाठी जाळी, माहिती फलक ,धूळ नियंत्रणासाठी विंड ब्रेकिंग, खदान फेन्सिंग, कामगारासाठी नोज मास्क , विस्फोटक द्रव्य वापर करताना सूचना फलक लावण्यात आलेले नाही. यामुळे कंपनीचे सुरक्षेचे दावे फोल ठरले आहे. तसेच रस्त्यच्या बाजूला असलेला नाला यामुळे अपघात होऊन मोठी हानी तसेच ब्लास्टिंग मुळे अपघाताच्या घटना वाढल्या .अनेक पशु-पक्षांना दुखापती झाल्या नियमाचा फज्जा केल्या जात असल्याने नुकताच आवाळपूर येथिल निष्पाप तीन बालकाची पाण्यात बुडाल्याची हृदयाचे ठोके वाढवणारी घटना घडली असच प्रकार कुसुंबी येथे घडण्याची शक्यता बळकावली आहे गावालगतच पाणीसाठा धोक्याची घंटा ठरणार असल्याने गावकऱ्यांनी आरोप केला असून तातडीने सुरक्षेच्या उपाय योजना करून जिव, घेणारा खेळ थांबवावा अशी मागणी केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *