अखिल भारतीय सरपंच परिषदेची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषित.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– गावाची संसद असलेल्या ग्रामपंचायतीत निवडून येणाऱ्या सरपंचा समोरील प्रश्न सोडवण्यासाठी, प्रशासनावर राज्यपातळीवर दबाव गट तयार करून गावाचा विकास साधण्या करिता, अखिल भारतीय सरपंच परिषद कार्य करीत आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतदादा पाटील, विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड देवा पाचभाई, विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, मार्गदर्शक बापूरावजी मडावी यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र देवरावजी कराळे यांचे अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात जिल्हा उपाध्यक्ष, सावली तालुक्यातील चिचबोर्डी चे सरपंच सतीश नंदगिरवार, जिल्हा सचिव तथा प्रसिद्धी प्रमुख, कोरपना तालुक्यातील नांदा फाटा चे ग्रा. प सदस्य रत्नाकर चटप, सहसचिव, मुल तालुक्यातील सुशी दाबगाव चे सरपंच अनिल सोनुले, कोषध्यक्ष, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी चे माजी सरपंच मोरेश्वर लोहे, समन्वयक, माजी पं. स. सभापती चंद्रपूर विजय बल्की, संपर्क प्रमुख, ग्रा पं सदस्य पिपरी ता चंद्रपूर चे पारस पिंपळकर, संघटक, उपसरपंच म्हसली ता नागभीड चे वसुधा गुरुपुडे, प्रवक्ता, उपसरपंच खांबाडा ता चिमूर चे मंगेश धाडसे तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी उमेश धोटे, सरपंच चौगान ता ब्रम्हपुरी, नर्मदा दत्ताभाऊ बोरेकर, सरपंच वडगाव ता वरोरा, सपना तामगाडगे, सरपंच आकसापूर ता गोंडपिपरी, शुभांगी आत्राम, सरपंच मिनगीरी ता सिंदेवाही व चंद्रपूर जिल्ह्यातील अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रत्येक तालुका अध्यक्ष हे जिल्हा कार्यकारणीचे पदसिद्ध सदस्य असतील अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *