कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड गडचांदूर येथे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ !!

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना अंतर्गत गडचांदूर उप बाजारपेठ मार्केट यार्ड वर शेतकरी उत्पादित सोयाबीन लिलावाद्वारे खुल्या बाजारपेठेत खरेदी सुरु झाली आहे. व त्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणले होते.शुभारंभ दिनी ४७३० रुपये भावाने खरेदी करण्यात आले.व पहिल्या दिवशीच आवक हि चांगल्या प्रकारे होती. कृषी उत्पन्न बाजार समिती गडचांदूर चे सचिव श्री.कवडूजी देरकर यांनी प्रथम बोली लिलावाद्वारे माल विक्री केलेला प्रथम शेतकरी श्री.बापूराव गोरे यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी व शिवमांगल्य शेतकरी उत्पादक कंपनी यांनी हि सोयाबीन खरेदी केली. व बाजार समितीने अडत व दलाली मुक्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सोयाबीनची खरेदीची सुरूवात केली.व शेतकऱ्यांना कोणतेही अडत नसल्याने RTGS द्वारे धान्य विक्रीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याने तसेच शेतकऱ्यांने स्वत: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर माल तुलाई होत असल्याने कसल्याही प्रकारची शेतकऱ्याची लुट केल्या जात नसल्याचे मत शेतकऱ्याने व्यक्त केले.या प्रसंगी सय्यद आबिद अली,गणेश वाभिटकर,शंकर ठावरी,अझहर शेख, तसेचकृषी उत्पन्न बाजार समितीचे गोरे,राठोड,व सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीचे CEO अंगद गुट्टे व इतर शेतकरी उपस्थीत होते. सचिव देरकर यांनी व्यापाऱ्याचे घरी थेट माल विक्री न करता यार्डवरच विक्री करावा अडत पद्धती बंद असल्याने शेतकऱ्याची पिळवणुक होऊ नये या लिलावात भाग घेऊन ज्यादा भावाचा लाभ घ्यावा ,कोरपना व गडचांदूर यार्डवर बाजार समीती काटयाची व्यवस्था केल्याने व व्यापाऱ्याच्या काटयावर शेतकऱ्याची पिळवणुक होऊ नये यासाठी व्यवस्था केली आहे. तसेच पणन महामंडळ व कृषी उत्पण बाजार समीती सोयाबिज तारण योजना गडचांदूर येथे सुरू केली आहे तारण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकऱ्याना केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *