



–
लोकदर्शन-नागपूर(प्रतिनिधी👉-गुरुनाथ तिरपणकर
वाशिम येथील कोष्टी समाजातील तरुण तडफदार व्यक्तीमत्व कुमार यशवंत महाजन यांनी अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सतीशजी दाभाडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कुमार यशवंत महाजन हा विदर्भ विभाग रजणी ट्राॅफी चा बीसीसीआयचा आणि फिटनेस कन्सल्टंट आहे. कुमार यशवंत यांनी मेहनत घेऊन,जिद्द आणि चिकाटी ठेवून हे यश प्राप्त केले आहे. कुमार यशवंत हा मुळातच खेळाडु वृत्तीचा,क्रिकेटसह इतर सर्व खेळात रुची ठेवणारा,आणि याच विषयात डिग्री प्राप्त करणारा.वाशिम सारख्या छोट्या शहरातून कुमार यशवंत यांनी घेतलेली भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे.वाशिमकरच नव्हे तर संपूर्ण समाजाला कुमार यशवंत चा सार्थ अभिमान आहे. नुकताच योगायोगाने कुमार यशवंत सतीश दाभाडे यांच्या घरी आल्यामुळे सतीश दाभाडे परिवाराने कु.यशवंत महाजन याचा यथोचित सत्कार केला.सौ.सुनिता सतीश दाभाडे यांनी त्याचे औक्षण केले.दाभाडे परिवाराने शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी सतिश दाभाडे यांची मोठी मुलगी सौ.सायली,जावई श्री.आदित्य जांभेकर आणि लहान मुलगी आर्किटेक्ट श्यामली दाभाडे उपस्थित होती. सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत कुमार यशवंत चा सत्कार करताना मन भरून आले आणि अभिमानही वाटला. सर्व चर्चेअंती पुनश्च कुमार यशवंत यास भावी वाटचालीसाठी आशिर्वाद व शुभेच्छा देण्यात आल्या.