



लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
स्व . सुशिलाबाई रामचंद्र राव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपूर च्या वतीने महात्मा गांधी जंयती सप्ताह निमित्त ग्राम परिसर स्वच्छ्ता व रांगोळी स्पर्धा चे आयोजन खुटाळा या गावी आयोजित केले होते .यावेळी ग्राम स्वच्छ्ता व महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी रांगोळी स्पधेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन गावातील उपसरपंच श्री. रोशन रामटेके उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून नवज्योती दुर्गा महिला मंडळाच्या अध्यक्ष.सौ. लीलाताई माथंकर , सचिव .सौ. सुरेखा डोहे उपस्थित होत्या तर प्रमुख मा्गदर्शक म्हणुन परिवेक्षिका प्रा. डॉ . प्रगती नरखेडकर उपस्थित होत्या . हा कार्यक्रम एस आर एम कॉलेज ऑफ पडोली चंद्रपूरचे प्रा डॉ सुनील साकुरे यांच्या नियंत्रणात व प्राध्यापिका डॉ प्रगती नरखेडकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला .महिला रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पायल अरहाटे ,व्दितीय क्रमांक वृषाली कडू तृतीय क्रमांक स्नेहल देहारकर व प्रोत्साहन बक्षिस आर्यन खडसे यांना देण्यात आले या कार्यक्रमाला गावातील नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला ,या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. आर. एम कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली. चंद्रपूर येथील एम एस डब्लु व्दितीय सत्रात शिक्षण घेणाऱ्या सामुदायिक विकास च्या विद्यार्थ्यांनी परीश्नम घेतले कार्यक्रमाचे संचालन कु प्रतीक्षा मातेरे या विद्यार्थिनीने केले तर पाहुण्यांचे आभार कू पूनम रामटेके या विध्यार्थिनिने केले. या कार्यक्रमाला आयोजक म्हणून लाभलेले विद्यार्थी पल्लवी तूपसुंदर , अमोल कोरवते उपस्थित होते.