गडचांदुरच्या सभापतीना न. प. विरोधी पक्ष नगरसेवकांच्या मागणी मुळे मिळाल्या खुर्च्या*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

*गड़चांदूर* ..गड़चांदूर शहराला सन २०१४ मध्ये नगर परीषदचा दर्जा प्राप्त झाला. मोठी निधि प्राप्त
व्हायला सुरुवात झाली व बऱ्यापैकी विकास कामे हळूहळू होऊ लागली त्या दरम्यान दूसरी सार्वत्रिक निवडनुक २०२० ला पार पडली.आणि त्या निवडनुकित गडचांदुर नगरवासिनी मोठ्या अपेक्षा ठेवुन कांग्रेसच्या सौ सविता ताई टेकाम याना थेट नगराधक्ष म्हणून निवडून दिले.शहरातील विकास करतील मोठी अतिरिक्त निधी आणतील,जनतेच्या समस्या तातडीने सोडवतील परंतु झाले उलटे मागील अडीच वर्षाचा लेखाजोखा बघितला तर विकास कामे सोडा,सफाई कर्मचारी चे वेतन सोडाच परंतु सन्माननीय नगराध्यक्ष यांना आपल्याच पक्षाच्या आपणच निवड केलेल्या सभापतींना साध्या आठ महिन्या पासून हक्काच्या खुर्च्या ,टेबल मिळवून देवू शकले नाही तर दूसरी अपेक्षा काय करायची अशी चर्चा शहरात सर्वत्र चालू आहे.
सभापती महोदयाकडे विरोधी पक्ष भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांना जनतेचे प्रश्न सोडविण्यास वारंवार गरज भासत होती परंतु त्या सभापतींना हक्काची खुर्ची नसल्याने ते न प कार्यालयात बसत नाही हे लक्षात आल्याने त्यांनी मुख्याधिकारी यांचे कडे सन्माननीय सभापति महोदया करीता स्वतंत्र खुर्ची,टेबल,नेमप्लेट ची मागणी केली असता मुख्याधिकारी यानी तात्काळ मागनीची दखल घेत न प कार्यालयात त्यांना स्वतंत्र खुर्ची,टेबल,नेमप्लेट सह व्यवस्था करन्यात आली.
आता खरच सभापति महोदय न प
कार्यालयात बसतील का ? जनतेच्या समस्या सोडवतील का ? नाहीतर नगराध्यक्ष,उपाधक्ष यांच्या खुर्ची सारखेच शोभेची खुर्ची असतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *