मार्डा सेवा सहकारी संस्था काँग्रेसच्या ताब्यात. अध्यक्षपदी विनोद झाडे तर उपाध्यक्षपदी सत्यपाल देरकर

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा मार्डा येथील सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला असून येथे एकूण १३ पैकी ८ काँग्रेसचे, भाजपचे ३ तर शे. संघटनेचे २ सदस्य निवडून आले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणूकीत सुध्दा काँग्रेसने बाजी मारली असून अध्यक्षपदी विनोद झाडे तर उपाध्यक्षपदी सत्यपाल देरकर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. या संस्थेवर संचालक म्हणून काँग्रेसचे राकेश वांढरे, बालाजी भोयर, शंकर बोबडे, वासुदेव शेरकी, सौ. माया भोयर, मधुकर चौधरी निवडणूक आले आहेत.
नवनिर्वाचीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, पेल्लोरा चे सरपंच अरूणा विनोद झाडे,
सुरेंद्र गावंडे, मंगेश भोयर, लहुजी भोयर, दिनकर आत्राम, सुरेश भोयर, अंबादास निरांजने, गजानन राजूरकर, माणिक देठे, बाळू देरकर, रामकिसन धानोरकर, दादाजी कडसकर, नथ्थू बोबडे, चंद्रशेखर ऐकरे यासह अनेकांनी उपस्थित राहून अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here